in

साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला जाताना महिला बाईक रायडरचा अपघातात मृत्यू

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या साताऱ्यातील हिरकणी ग्रुपच्या सदस्य शुभांगी संभाजी पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 32 वर्षीय शुभांगी यांचे नांदेडजवळ अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघाती निधन झाले आहे.

बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या होत्या.नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्याची ही मोहीम होती. त्यांनी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. तिथून तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

नांदेडमध्ये टँकर चालकाची धडक : माहूर गडावर रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकर चालकाने जोरदार धडक दिली. बाईकवरुन पडल्यानंतर टँकर डोक्यावरुन गेल्यामुळे शुभांगी पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले आहे. दरम्यान, अपघातानंतर अर्धापूर पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला असून शुभांगी पवार यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून 13 वर्षीय मुलीचा खून

राज्यात आज 2,069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद