in

“इटालियन डोहाळे लागल्याने शिवसेनेकडून राममंदिराची बदनामी”

राममंदिराची जमीन खरेदी करण्यावरून सध्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती. त्याला भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रत्युत्तर दिलंय.

इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

“शिवसेनेला विश्वास नसेल तर राममंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं पण राम मंदिराची बदनामी करु नये”, असं आचार्य तुषार भोसले म्हणाले आहेत. “शिवसेनेला इटालियन डोहाळे लागल्यामुळे आज ते राम मंदिराचीही बदनामी करत आहेत. कोणतीही अधिकृत माहिती न घेता संजय राऊत यांनी राममंदिराची बदनामी चालवली आहे”, असा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच ट्रस्टने पारदर्शक आणि बाजारभावानेच व्यवहार केला असल्याचंही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

कौतुकास्पद! महिला सरपंचानं मंगळसूत्र गहान ठेऊन भागवली गावाची तहान