पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील राजेगाव येथे भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मलठण येथील विष्णू उर्फ लाला बलभीम अमनर हा पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही त्याने भीमा नदी पात्रात वाळू उपसा करून वाळू चोरी करीत असल्याची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
यावेळी पोलिसांनी 60 लाख रुपये किंमतीच्या वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी जिलेटीनच्या साहाय्याने नष्ट करीत 6 जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी केली आहे.
Comments
Loading…