in

ग्रेटा थनबर्गचे दिशा रवीच्या समर्थनार्थ ट्वीट… लोकशाही मूल्यांवर केलं भाष्य


दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या ग्रेटा थनबर्गने टूलकिट प्रकरणातील दिशा रवीच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. दिशा रवीला बेंगळुरूतून अटक झाल्यानंतर ग्रेटाने पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले आहे. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर दिशाला आणखी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देशभरात हे प्रकरण तापलेलं असतानाच या अटकेवरून ग्रेटानं लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली आहे.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचं मूलभूत अंग असायलाच हवेत”, असं ग्रेटानं ट्विट करून म्हटलं आहे.

दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींनीच अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं – चंद्रकांत पाटील

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण; कोल्हापुरात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’