in ,

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. आता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली.

सध्या ते घरीच आयसोलेशनमध्ये असल्याचे कळतंय. घरात राहा आणि सुरक्षित राहा. मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, अशी इन्स्टास्टोरी मोहन जोशी यांनी शेअर केली आहे. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत.

मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. मोहन जोशीही शूटींगनिमित्ताने गोव्यात होते. मात्र गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच एंटरटेनमेंट सोसायटी आॅफ गोवाने राज्यात शूटींगची परवानगी नाकारली. यानंतर नुकतीच मालिकेची अख्खी टीम मुंबईला परतली होती.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

दाक्षिणात्य ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण