in

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू

अभिनेता रजत बेदीच्या (Rajat Bedi) कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या 39 वर्षीय राजेश रामसिंग दूत याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने मुंबईच्या डी एन नगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम 304A अन्वये निष्काळजीपणे एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी रजत बेदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता रजत बेदीविरोधात सुरुवातीला कलम 279 आणि 338, तसंच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिली होती. कार स्वतः रजत बेदी चालवत होता. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला रजतच्या गाडीने उडवलं, असं कुर्डेंनी सांगितलं होतं. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

डोक्याच्या दुखापतीमुळे गंभीर होती प्रकृती
“माझे पती कामावरून परतत असताना सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच 02 सीडी 4809 ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा” अशी मागणी राजेशची पत्नी बबिता दुत यांनी यांनी केली होती.

कोण आहे रजत बेदी?
अभिनेता रजत बेदीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल खिलाडी, जोडी नंबर वन, जानी दुश्मन, कोई मिल गया, अक्सर, पार्टनर यासारख्या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन उद्या लाँच होणार

मुंबईत कलम 144 लागू; 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई