in ,

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अभिनेत्रीचा मानसिक छळ, निर्मात्यांसह कलाकारांविरोधात पोलीसात तक्रार

स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेतील निर्माते आणि सर्व कलाकारांवर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. माझे रॅगिंग करण्यात आल्याचा आरोप अन्नपूर्णा विठ्ठल यांनी केला आहे. अशी माहिती त्यांनी युट्यूब चॅनेलवर व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

अन्नपूर्णा या मुळात दक्षिण भारतीय आहे. गेल्या 25 वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अन्नपूर्णा यांची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही पहिली मराठी मालिका होती. या मालिकेत निर्माते आणि सर्व कलाकारांकडून आपल्याला त्रास दिल्याचा आरोप त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
आरोप काय ?

“मराठी सिनेसृष्टीत अमराठी कलाकारांना टिकू दिले जात नाही. या मालिकेत मला मानसिक त्रास देण्यात आला, रॅगिंग करणे जाती विषयी बोलण्यात आलं, या मालिकेचे दिग्दर्शक भरत गायकवाड याने अनेकदा मला म्हातारी म्हणून आवाज दिला. तसेच सेटवरही अश्लील शिवीगाळ केली आहे. यात अभिनेत्यांमध्ये सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर, दिग्दर्शक भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे आणि छोटेमोठे कलाकार यात सहभागी होते. सुनिल बर्वे त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर, किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला,” असे अन्नपूर्णा त्यांनी सांगितले.

मात्र सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी मालिकेतील निर्मात्याच्या विरोधात मानसिक त्रास आणि छळ केल्याबद्दल 22 नोव्हेंबरला दादर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर मालिकेच्या टीमकडून, निर्माते, दिग्दर्शक किंवा कोणत्याही कलाकारांकडून भाष्य करण्यात आलेले नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच होणार आई

हजारो आगरी कोळी बांधवांना परवाने वाटप