in ,

‘भाभीजी घर पे है’ फेम अभिनेत्रीने बनावट ओळखपत्र दाखवून घेतली लस

‘भाभीजी घर पे है’ या गाजलेल्या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री सौम्या टंडन हिने बनावट ओळखपत्र दाखवून लस घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा ठाणे मनपा चौकशी अहवालात खुलासा झाला आहे.

राज्य सरकारकडून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले असले, तरी ठाण्यात अभिनेत्री सौम्या टंडन हिने लस घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. हे लसीकरण तिने बोगस ओळखपत्र दाखवून केले आहे. या प्रकरणात अभिनेत्री सौम्या टंडनचे नाव चौकशी अहवालात आले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

दरम्यान चौकशी समितीने 21 श्रीमंत तरुण आणि तरुणींचे बनावट ओळखपत्र तयार करून 15 जणांना अशा प्रकारे लस देण्यात आली असल्याची माहिती उजेडात आणली आहे.

‘भाभीजी घर पे है’ या प्रसिद्ध मालिकेत सौम्याने साकारलेली अनिता मिश्रा ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. आधी शिल्पा शिंदे आणि सध्या शुभांगी अत्रे साकारत असलेल्या अंगुरी भाभी इतकेच या ‘गोरी मेम’चेही चाहते आहेत. सौम्याने जब वि मेट चित्रपटात करिनाच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ दिनासाठी राज्य सरकार कडून नियमावली जारी

Maharashtra Corona; महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट