मुंबईच्या मालाडमधील दानापाणीमध्ये कांदळवनाच्या कत्तल होत असल्याच्या बातम्यांची मालिका लोकशाही न्यूज चॅनेलने चालवली होती. या बातम्यांमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष घालावे यासाठी हा प्रश्नही लावून धरला होता. अखेर लोकशाही न्यूज चॅनेलच्या या पाठ्पुराव्याला यश आले आहे. आदित्य ठाकरे यांनी या विषयावर बैठक बोलावून कांदळवनाची कत्तल करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत.
मालाडच्या दाणापाणी परिसरात एकेकाळी असंख्य कांदळवनाची झाडे होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून या परिसरात कांदळवनाची कत्तल सुरू होती, तसेच या कांदळवनावर डेब्रीज टाकून त्याचे नुकसान सुरू असल्याची बातमी लोकशाही न्यूज चॅनेलने चालवली होती. या बातम्यानंतर आता पर्यावरण मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावून चौकशीचे आदेश दिले.
या बैठकीत आदित्य ठाकरे म्हणाले, कांदळवनाची कत्तल व डेब्रीज टाकण्याच्या प्रकाराला तत्काळ आळा घालून आवश्यक ती कठोर पाऊले उचलावी. कांदळवनाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत किंवा कुंपण बांधणे, सीसीटीव्ही लावणे आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कांदळवनांवर डेब्रीज टाकणारी वाहने ताब्यात घेण्यात यावीत, तसेच फक्त वाहनचालकावर कारवाई न करता डेब्रीजचा स्त्रोत शोधून संबंधीत बांधकाम विकासकावरही कारवाई करावी. तसेच संबंधीतांवर वन आणि पर्यावरण संवर्धनविषयक नियमांनुसार एफआयआर दाखल करण्यात यावेत. या प्रकरणांचा न्यायालयातही योग्य पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचनाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
Comments
Loading…