in ,

कौतुकास्पद : पुणे जिल्ह्यात लसीकरण ५० लाखांपुढे

पुण्यात डॉक्टर्स, दोन्ही महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रयत्नान पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार पडला आहे. यामध्ये 31 लाख 74 हजार 447 जणांचा पहिला डोस तर 18 लाख 45 हजार 631 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. महापालिकेने लसीकरणासाठी 200 केंद्र उभारली असून इतर खासगी रुग्णालयातदेखील मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत निम्मे लसीकरण पूर्ण झाले असून आगामी काळात उर्वरित नागरिकांचा पहिला व दुसरा डोस वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान अद्याप कायम आहे.

१८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण काही काळ थांबवावे लागले. त्यानंतर खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरू झाल्यावर त्याला पुन्हा वेग प्राप्त झाला. पुणे शहरात आणि शहरालगत असलेल्या तिनही कॅंटोन्मेंट बोर्डात शनिवारी दिवसभरात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तिनही बोर्डात अवघे 26 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 16 जणांवर रुग्णांलयात उपचार सुरू तर 10 जण गृहविलगीकरणात आहेत.

राज्याच्या तुलनेत बारा टक्के लसीकरण पुण्यानं केलं, तर देशाच्या तुलनेत दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रानं केलं आहे. राहिलेलं लसीकरण वेगात कसं करता येईल याची चर्चा करण्यात आली आहे. मिशन कवच कुंडल या मार्फत लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पुणे शहरात सीरमच्या सहकार्यानं तर ग्रामीण भागातही लसीकरण केलं जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इगतपुरीत भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पंतप्रधान ‘मन की बात’द्वारे करणार संबोधन