in

विमान प्रवास होणार स्वस्त! आजपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू

रेल्वे तिकीटाच्या दरात आता विमान प्रवास

विमानाचे तिकीट दर आता रेल्वेच्या एसी-२ टायर अर्थात द्वितीय श्रेणी वातानुकूलित प्रवासापेक्षा स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करत आज सोमवार पासून विमानसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विमानाचे तिकीट दर निम्म्याहून कमी होत आहेत.

कोरोना निर्बंधांमुळे विमानोड्डाणांवर निर्बंध होते. एक आसन सोडून प्रवाशांना तिकीट दिले जात होते. त्यामुळे विमानसेवा कंपन्यांना कमी प्रवाशांना तेवढ्याच इंधनखर्चात विमान उडवावे लागत होते. परिणामी तिकीटदर महागले होते. मात्र, 18 ऑक्टोबर पासून विमानाची आसने १०० टक्के भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विमानसेवा कंपन्यांना तेवढ्याच इंधन खर्चात अधिक महसूल मिळणार आहे. यामुळेच विमान तिकीटदर कमी होणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्ह्यामुळे रखडलं विमानाचं लँडिंग

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी “A फक्त तूच” ची टीम