in

दीड वर्षानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्य सरकारने मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोककलावंतांना आपल्या लोककला सादर करता येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याने आता दीड वर्षानंतर शाहिरीपासून ते तमाशांच्या फडापर्यंतचे कार्यक्रम रंगणार आहेत.

तसेच गावागावांमधील जत्रा-यात्रांमध्ये ढोलकीची थाप आणि घुंगरांच्या बोलांमधून तमाशाची बारी रंगण्याचा मार्ग खुला झाला आहे.शासनाने 50 टक्के क्षमतेनुसार सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत परिपत्रक काढले. मात्र त्यात लोकनाट्य तमाशाचा उल्लेख नसल्याने पोलीस प्रशासनाकडून कार्यक्रम करण्यास परवानगी मिळत नव्हती, ही बाब मराठी तमाशा लोककलावंत परिषद महाराष्ट्र यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीसप्रमुखांना याविषयी आदेश दिले आहेत. त्यानुसार बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला तसेच टुरिंग टॉकीजला (फिरते सभागृह) कोरोना नियमांचे पालन करून सादरीकरणास परवानगी असल्याचे सांगण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून

ST Employee Strike | गोपीचंद पडळकर- सदाभाऊ खोत ‘आझाद’; नवे नेतृत्व अॅड गुणरत्न सदावर्तेकडे