in ,

लोककलावंत कांताबाई सातारकर यांच्यानंतर कन्या आणि नातवाचंही निधन

मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनामुळे निधन झालं होतं. यानंतर त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. अवघ्या आठ दिवसांत एकाच कुटुंबातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबीयांना कोरोनाची लागण झालेली होती. कुटुंबातील जवळपास ८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला… राजकीय चर्चांना उधाण!

जम्मू-काश्मीर लहान मुलीचा व्हीडिओ व्हायरल, होमवर्कविरोधात थेट पंतप्रधानांनाच केली तक्रार