in

सैराटनंतर नागराज मंजुळे, आकाश ठोसर येणार एकत्र

नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटानंतर मराठी सिनेमासृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराटचे सर्वच क्षेत्रातून कौतुक करण्यात आले. सैराट चित्रपटा हा मराठी चित्रपट क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला आहे. फॅंड्री, नाळ, सैराट या तीन चित्रपटानंतर आता नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे या जोडीवर महाराषट्राने प्रचंड प्रेम केलं.आता हीच जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून. ‘घर बंदूक बिरयानी’ हा आगामी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत.

नागराज मंजुळे आणि झी स्टुडीओ या चित्रपटाची निर्मीती करणार असून आकाश ठोसरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घर बंदूक बिरयानी चांगभल म्हणत पोस्टर टाकलं आहे. सिनेमाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांनी लिहीली असून चित्रपटाला संगीत ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. 2022 साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे समजत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

११ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त