in

ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राने दाखवला जाहिरातीत जलवा

भारताचा सुवर्णपुत्र नीरज चोप्राने आता आपली जादू अभिनय क्षेत्रातही दाखवली आहे. टोकियो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून महिन्याहून अधिकचा काळ लोटला. पण अजूनही नीरजची हवा कमी झालेली नाही. त्यातच नीरजने एका नव्या जाहिरातीत केलेल्या अभिनयाने तर त्याला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.

नीरजने सुवर्णपदक मिळवल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. अनेकजण नीरजला आपल्या कंपनीचा चेहरा बनवण्यासाठी उत्सुक आहेत. याच संकल्पनेला धरुन क्रेडिट कार्डच बील भरण्यासाठी उपयोगी असणाऱ्या ‘क्रेड’ (CRED) या अॅपने त्यांच्या जाहिरातीत नीरजकडून अभिनय करवून घेतला आहे. मागील वर्षीपासून बाजारात आलेल्या या अॅपमध्ये अनेक खेळाडू तसेच अभिनेते काम करत असतात. त्यातच आता नीरजने देखील या अॅपच्या जाहिरातीत काम केलं आहे. 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच ही जाहिरात प्रदर्शित झाली असून नीरजने स्वत:ही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये नीरज स्वत: वेगवेगळ्या रुपात दिसत असून समाजातील अनेक जण नीरजच्या यशाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करुन घेण्याचा वापर कशाप्रकारे करत आहेत. ते दिसून येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

राज्यात ३ हजार ४१३ नवीन कोरोनाबाधित आढळले