in

व्हायरल पोस्टची झाली चर्चा, फडणवीसांनी मानले आभार अन् अजितदादांकडून कारवाईचे आश्वासन

सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या राजकीय मतांवरून त्यामागे कोणता राजकीय पक्ष आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जातात. तसाच काहीसा प्रकार आज विधानसभेत झाला. जळगावमधील शासकीय वसतिगृहातील प्रकारावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या पोस्टचा मु्द्दा उपस्थित झाला आणि त्याबद्दल फडणवीस यांनी लगेच आभार मानले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच कारवाईचे आश्वासन दिले.

विधानसभेत आज जळगावच्या शासकीय वसतिगृहात झालेल्या गैरप्रकारचा मुद्दा उपस्थित होताच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ६ वरीष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे वसतिगृह प्रशासनाला क्लीनचिट दिली. यानंतर अशाच घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितला. उस्मानाबादमध्ये हनुमान चौकात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने सुसाईड नोटमध्ये केला आहे”, असं फडणवीस यांनी सांगितले. यांनतर नाना पटोलेंनी, “फडणवीसांबद्दलच्या एका व्हायरल पोस्टची माहिती दिली. या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एका तृतीयपंथीशी खोटे आश्वासन देऊन अनैतिक संबंध ठेवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा पोस्ट व्हायरल होत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पावित्रा घेत, चांगल्या भावनेतून त्या पोस्टविषयी सांगितल्याने नाना यांचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिंचवडमधल्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली असल्याची माहिती देत, याबाबत तक्रार देखील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. फडणवीस पुढे म्हणाले, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात काहीही लिहिलं तरी त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने लिहितो आणि त्यावर कारवाई केली जात नाही. या सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना अजित पावर यांनी “कार्यकर्ता कुणाचाही असला तरी त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे त्या कार्यकर्त्यावर आजच्या आज कारवाई केली जाईल आणि त्याला अटक केली जाईल”, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SSC-HSC Exam | दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन होणार

चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे