in

Ahmednagar Hospital Fire; अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अहमदनगर | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहमदनगर येथील आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकूण १० जणांनी प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेत कोरोना रूग्णांचा उपचार घेताना जागीच मृत्यू झाला. या घटनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच आगीच्या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटूंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही आगीच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींसाठी शोक व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh; अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

तेलाच्या टँकरमध्ये भीषण स्फोट; 91 नागरिकांचा मृत्यू