in

अहमदनगर जिल्ह्याला पावसाने झोडपले

राज्यात पावसाने पुन्हा दमदार कमबॅक केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरूच आहे. जिल्हात नगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये  पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. शेवगाव-गेवराई मार्ग पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस सध्या बंद ठेवला आहे.

अहमदनगर जिल्ह्याल्यातील सध्या स्थिती:
शेवगाव तालुक्यातील वरुर येथील नांदणी व चांदणी नदीला पूर आल्याने ऊस, कापूस, सोयाबीन व तुर या उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे . जिल्ह्यातील वरुर गावात पाणी शिरल्याने ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी ऑफिस, वाचनालय,मारुती व शनि मंदिराचा परिसर पाण्याखाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे व पुरामुळे नदी काठचे रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत.

शेवगाव तालुक्यातील आखेगाव, भगूर, वरूर, सोमटने या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. पुराच्या या पाण्यात अनेक शेळ्या, जनावरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे . आंबा नदीला महापुराची परस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी काही ठिकाणी जास्त असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील नदी पात्रात ट्रकसह ड्रायव्हर पाण्यात अडकला होता. ट्रक पाण्याखाली गेल्याने ड्रायव्हर टपावर उभा राहिला, सकाळी पोलीस, महसूल,पोलीस यांच्या मदतीने त्याला दोरी टाकून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हवामान खात्याचा अंदाज
हवामान शाळेच्या अंदाजानुसार अजूनही पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Big Boss Season 15 | अभिनेत्री निया शर्माची होणार तुफानी एन्ट्री…

मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल