in

बदलापुरात वायुगळती; नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास

एमआयडीसी भागात वायुगळती झाल्याने शिरगाव आपटेवाडी या परिसरात ३ किमीच्या परिघात लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. वायुगळतीमुळे काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास देखील जाणवू लागला. मात्र ही वायुगळती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. ही घटना सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली.

कंपनीमध्ये एका रिॲक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून वायुगळती झाली. मात्र हा वायू ज्वलनशील नाही. असे असले तरी हा वायू श्वास घेण्यास त्रासदायक ठरणारा असून त्वचा, डोळे,यांना काही प्रमाणात बाधा करणारा आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे बदलापूर अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज मुंबईत लसीकरण सुरळीत सुरू

Ashiyana building | ओशिवारा येथील इमारतीला भीषण आग