लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यात एका 22 वर्षीय तरुणीने केलेल्या आत्महत्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे सांगितले.
मुळची परळीची असलेली 22 वर्षाची ‘शक्ती’ शिक्षणासाठी पुण्यात आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1च्या सुमारास तिने हेवन पार्कमधील तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा एका बड्या नेत्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या इतर नेत्यांनी चौकशीची मागणी केली होती.
याबाबत पुण्यामधील पत्रकार परिषदेत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले की, काही पक्षांना दुसरे काही काम नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. चौकशीत काय ते समोर येईलच, असे ते म्हणाले.
Comments
Loading…