in

वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंत्रिमंडळ मोठा निर्णय घेऊ शकतं…अजित पवारांचे संकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने पावलं पडणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही महत्वाचे संकेत दिल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करणार असण्याबाबत संकेत दिले आहेत.

अजित पवार यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या बैठकीनंतरच उर्वरित बाबी स्पष्ट होतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केरळ विधानसभा निवडणूक २०२१ : शरद पवारांनी केली राष्ट्रवादीच्या आमदाराची हकालपट्टी

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर कमेंट्सचा पाऊस… ‘ये नयन डरे डरे’!