in

आदित्य ठाकरेंचा अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री’ असा केला उल्लेख!

अमोल धर्माधिकारी(पुणे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील कोरोनासंबंधी निर्बंध व नियमावली विषयी बोलताना राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्याविषयी बोलताना आदित्य ठाकरेंचा उल्लेख चक्क ‘मुख्यमंत्री’ असा केला!

पत्रकारांनी “राज्यातील निर्बंध अधिक कठोर होणार का?” असे विचारले असता, “जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील” असे वक्तव्य केले.

ह्या वक्तव्यामूळे आता राज्यभरात भलत्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांनी हे विधान जाणीवपूर्वक केलं ही अनावधानाने अशी चर्चा राजकीय वर्तूळातून ऐकू येतेय.

पुणे जिल्हा बँक निवडणूकीनंतर कोणाकडे कोणता पदभार सोपावण्यात आला हयाविषयी बोलताना राज्यातील निर्बंधांविषयी बोलताना ते म्हणाले, “नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील.”

अजित पवारांच्या ह्या वक्तव्यामूळे राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे फिरू लागले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो!

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune District Bank; पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे

आमिर खान आणि किरण राव सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा आले एकत्र!