in

कठोर निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

राज्यात कोरोनाची परिस्थिती पुन्हा धोकादायक बनत आहे. मुंबई सोबतच अकोला, अमरावती, यवतमाळ या भागात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. याच पाश्वभूमीवर नियमनाचे पालन करा, कठोर निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत आहे. मुंबईसोबतच अकोला, अमरावती,यवतमाळ या भागात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागरिक नियमांचे पालन करत नाही आहे. मास्क लावत नाहीत त्यामुळे लॉकडाऊन बद्दल विचार सुरू आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.

लोकांनी नियमांचे पालन करावे, संसर्ग वाढणारा नाही म्हणून खबरदारी असे आवाहन देखील या वेळी त्यांनी केले. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून, याबैठकीत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात सामना सुरू असताना क्रिकेटपटूचा मृत्यू

देशात प्रथमच एका महिलेला फाशी; वाचा काय आहे प्रकरण?