in

उपमुख्यमंत्री अजित पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘मोदी हे बँकेसंदर्भात कधी, कुठला निर्णय घेतील हे सांगता येत नाही. राष्ट्रीयीकृत बँकादेखील अडचणीत आल्या आहेत, असा आरोप करत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारनं काही लाख कोटी रुपये मोठ्या उद्योगपतींना दिले आहेत, असा गंभीर आरोपही अजित पवारांनी केला. ते बारामतीमधील सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

उपमुख्यमंत्री असताना राज्य बँकेत जाऊ शकत नव्हतो तरीदेखील आमच्या चौकशा लागल्या. सीआयडीने चौकशी केली त्यात क्लीनचिट मिळाली. एसीबी चौकशी केली त्यातही क्लीनचिट मिळाली. आमचा दोष नसताना आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत अजित पवारांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राकेश टिकैत यांची यवतमाळमधील महापंचायत रद्द

डास चावल्यानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रागावले; इंजिनिअरला तत्काळ हटवलं