in

अजित पवारांनी सोडलं मौन; ‘अनलॉक’वर उपमुख्यमंत्री म्हणाले…

राज्यात अनलॉक करण्यावरून सध्या गोंधळ सुरू आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल राज्यात पाच टप्प्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगितलं. तसेच पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक करणार असल्याची माहिती दिली.

यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून यासंदर्भात स्पष्टीकरण आल्यानंतर सरकारमधील गोंधळाची स्थिती चव्हाट्यावर आली. सारे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. दरम्यान, या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

“अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी करोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला होता असं स्पष्ट केलं आहे. . शेवटी सरकार कोणाचंही असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता

वृक्षवल्ली अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम