in

‘माझा अजित जितका तापट तितकाच प्रेमळ ही’!,आईने केलं अजित दादांच तोंडभरून कौतुक

अमोल धर्माधिकारी, पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. इन्कम टॅक्स विभागाने अजित पवारांच्या कुटुंबीयांवर सुरू केलेलं धाडसत्र अजूनही थांबलेलं नाहीये, यामध्ये शरद पवार असो सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे अजित पवारांच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळालं…त्यातच अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांनी पहिल्यांदाच अजित पवारांची कारकीर्द आणि त्यांचा स्वभाव अगदी काही शब्दांत मांडलाय.

स्वच्छता आणि खर बोलण्यात अजित कधीच मागे पुढे बघत नाही…माझा अजित जितका तापट आहे तितकाच प्रेमळही आहे असे उदगार त्यांनी काढलेत.सुरुवातीला ग्रामपंचायत नंतर कारखाना आणि बँकांमध्ये जिंकल्यानंतर तो राजकारणात उतरला.शरद पवारांनी अजितला मोठं केल्याचं ही त्यांनी नमूद केलंय.असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जीवनपट सांगताना त्यांच्या मातोश्री आशा पवार यांच्या डोळ्याच्या कडा ही पाणावल्या.त्यामुळे आशा पवार यांनी केलेल्या अजित पवारांच्या कौतुकानं अजित पवारांना सध्याच्या परिस्थितीत नक्कीच मोठा आधार मिळाला आहे.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूस्, पुणेच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दसऱ्यानंतर नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

Maharashtra Band | वसईत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीकसह 15 जणांवर गुन्हा