in

…अन मोदी म्हणतात कशी तुझी जिरवली; अजित पवार यांची पंतप्रधानावर पवार स्टाईल टीका

रूपेश होले,बारामती | अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला, तरी तेथे (पंतप्रधान नरेंद्र मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे पेट्रोल १०० च्या पुढे गेलं की, पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं…मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली..असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पवार स्टाईलमध्ये टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले.. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत..त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं.. की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं… मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये;मोदींनी पाकसह चीनचे उपटले कान

चंद्रपुरात ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी