in

पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, त्यांचे काम चालू आहे, ते गेल्यानंतर…; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. यावर “पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत. त्यांचे काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला जे बोलायचे होते ते बोलेन. आता ते घरी आणि वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आहेत. ते जेव्हा जातील तेव्हा मला जी भूमिका मांडायची आहे ती मी मांडेन आणि जे नियमानुसार आहे ते जनतेच्या समोर येईल. त्यात घाबरण्यासारखे काही कारण नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने इतर कंपन्यांवर छापे टाकले, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या संस्थांवर छापे टाकले, त्याचे वाईट वाटल्याचे पवार यांनी म्हटले.

“माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे वेळच्या वेळी भरले जातात. तरीही ही कारवाई राजकीय हेतूने केली की प्राप्तिकर विभागाला आणखी काही माहिती हवी होती, ते त्याबद्दल तेच सांगू शकतील. मात्र एका गोष्टीचे दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षांपूर्वी लग्ने झाली, त्या सुखाने संसार करतात, मुले-नातवंडे आहेत, त्यांच्या संस्थांवर छापे टाकले. त्यामागचे कारण समजू शकले नाही,” असे पवार यांनी गुरुवारी म्हटले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चीन आमने-सामने

ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचे दर