लोकशाही न्यूज नेटवर्क
जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, विनाशकाले विपरित बुद्धी!
जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत आमदार गोपीचंद पडळकरांनी या पुतळ्याचे अऩावरण मेंढपाळांच्या हस्ते केले.
तसेच शरद पवारांवर निशाणा साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, अहिल्यादेवींचे काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होते. म्हणूनच शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचे उद्घाटन होऊ नये. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होईल, अशी टीका त्यांनी केली होती.
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, विनाशकाले विपरित बुद्धी! एका मोठ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविल्यानंतरही ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांना काय महत्त्व द्यायचे?
Comments
Loading…