26 फेब्रुवारीला रिलीज होणारी ‘1962 – द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. वेब सीरिजमधील आकाश ठोसरचा लूक समोर आला होता. नुकताच आकाश ठोकरने या वेब सीरिजचे टीझर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. जेव्हा ही व्यक्तिरेखा मला मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. वास्तविक जीवनात खरे नाही, परंतु पडद्यावर ती वर्दी घालण्याची संधी मिळाली. असे आकाशने माध्यमांना सांगितले होते. आकाशने करिअरची सुरुवात सैराट या सुपरहिट चित्रपटाद्वारे केली होती.
Comments
Loading…