in

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये धमाका करणार असून सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीमध्ये सूर्यवंशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या तिन्ही अभिनेत्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग एका थिएटरमध्ये पाहायला मिळत आहेत. पण थिएटरमधील सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये या तिन्ही कलाकारांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, ‘चित्रपटांप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील मध्यांतर येईल याचा कुणी विचार केला नव्हता. पण रात्रीनंतर आशादायी पहाट उगवेलच. त्यामुळे आाम्ही पुन्हा येतोय. थिएटरमध्ये पुन्हा टाळ्या, शिट्ट्यांचे आवाज ऐकू येतील. कारण या दिवाळीला सूर्यवंशी येतोय. सहकुटुंब थिएटरमध्ये या आणि आमच्यासोबत दिवाळी साजरी करा.’

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कांदा पुन्हा महागला; दिवाळीपर्यंत दर वाढतेच राहण्याचे संकेत

इंधन संपल्याने, पुण्यातील भोर एसटी बस सेवा ठप्प