in

Alert ; राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा चाळीशी पारा जाणार !

काही दिवसांपासून राज्यातील थंडी कमी होत चालली आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढला असून मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऱ्याने चाळीशी गाठल्याचे दिसतेय. अचानक झालेल्या हवामान बदलाचा परिणाम सर्वच जिल्ह्यात जाणवू लागला आहे, विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्रातसह विदर्भातदेखील पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात आगामी काही दिवस लहरी हवामानाचा फटका बसणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. यासर्व गोष्टीचा परिणाम शेतीवर होणार असून, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

यावर्षी अवकाळी पावसाने बळीराजासह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र आता या गारठ्य़ासह उबदारपणा कमी होताना दिसत असून मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे या भागात किमान आणि कमाल तापमानात अशंतः वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यातील अकोला, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत चार अंश सेल्सियस पर्यंत वाढ झाल्याने विदर्भात तापमानाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. तर चंद्रपूर, वाशीम आणि आकोला या तीन जिल्ह्यात आगामी पाच तिवस उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याचे देखील हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.

सुत्रांनानुसार काही महत्वाच्या शहरांचे तापमान
चंद्रपूर ३९.०२
वाशीम ३९
अकोला ३९.०१
आणि नागपूर ३७.०६ अंश सेल्सियस

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरण; तपास एनआयएकडे द्यावा – देवेंद्र फडणवीस

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह सापडला, आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा