in

काँग्रेस आक्रमक : केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सोमवारी देशभरात ‘मौन व्रत’

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आपल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुखांना सोमवारी तीन तास मौन पाळण्यास सांगितले आहे. हे मौन आंदोलन सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर पाळले जाणार आहे.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी लखीमपूर खेरीला पोहोचताच शुक्रवारी रात्रीपासून ‘मौन’ ठेवले होते. आशिष मिश्रा शनिवारी पोलिसांकडे चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांनी मौन आंदोलन मागे घेतले.

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रदेश काँग्रेस समित्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, ११ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर सर्व राज्य मुख्यालयात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत पर्यंत ‘मूक आंदोलन’ केले जाईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुष्पक एक्सप्रेस प्रकरणात तीसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

डिझेल दराने ओलांडली शंभरी