in ,

आज जागतिक रेडिओ दिवस; अशी झाली रेडिओची सुरुवात

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दशकांपासून माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरं झाली आहेत. माध्यमं झपाट्यानं बदलत आहेत. रेडिओमध्ये अनेक बदल झाले आहेत. मात्र, आजही आकाशवाणी किंवा रेडिओविषयी सर्वसामान्य माणसाच्या हृद्यात एक जागा राखीव आहे. सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात आकाशवाणीला यश मिळालं आहे.

शांत, संयमी आणि अचूक माहितीसाठी लोक रेडिओ ऐकायचे. वैविध्यपूर्ण आणि सर्जनशील कार्यक्रमांसाठी रेडिओची ओळख आहे. १९९०च्या दशकापासून खासगी संस्था रेडिओच्या प्रसारणात उतरल्या. त्यानंतर हळूहळू आकाशवाणीच्या निवेदकाची जागा एफएमच्या ‘आरजे’ने घेतली. आकाशवाणी मृदू स्वर खासगी रेडिओच्या धिंगाण्यात बदलला. मात्र, आकाशवाणी आजही आपली ओळख टिकवून आहे. श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आकाशवाणी आजही आपली शैली टिकवून आहे. प्रेक्षक बदलला आहे. मात्र, आकाशवाणी आपल्या तत्वांवर कायम आहे आणि हीच आकाशवाणीची ओळख आहे. आकाशवाणीचा निवेदक आजही निवेदक आहे, तो ‘आर जे’ झाला नाही, इतकंच.

रेडिओचा इतिहास –

आजचा दिवस १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोनं 2011 मध्ये या जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली होती. भारतामध्ये १९२७ साली रेडिओचं प्रसारण सुरू झालं. मुंबई आणि मद्रासमध्ये हा भारतातील पहिला रेडिओ सुरू झाला. ‘न्यू वर्ल्ड, न्यू रेडिओ’ अशी यंदाची थीम आहे. मुंबई केंद्रांचं 1936 साली ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. हेच नाव बदलून 1957 साली ‘आकाशवाणी’ असं अधिकृत नाव देण्यात आलं. प्रसिद्ध हिंदी कवी पंडीत नरेंद्र शर्मा यांनी हे नाव सुचवलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यातील तरवडे वस्तीवर मध्यरात्री गुंडाचा तुफान राडा

National Women’s Day | पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा करणार?