गेल्या काही दिवसांपासून म्यानमारसंदर्भातील बातम्या आपल्या कानावर पडताहेत…तिथं लोकशाही सत्ता संपवून लष्करानं राजवट स्थापन केलीये…हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण सोप्या शब्दांत समजवून घेण्याचा प्रयत्न करूयात.
अलीकडंच म्यानमारच्या लष्करानं देशातील लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार बरखास्त करून लष्करी राजवट स्थापित केली…म्यानमारमधील सर्वोच्च नेत्या ऑंग स्यान स्यू की यांच्यासह सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी)च्या सर्व नेत्यांना अटक करून लष्करानं देशाची सत्ता बळकावली….या घटनेनंतर सर्व म्यानमार धुमसत आहे…यंगून आणि मांडले शहरात मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेत…देशात पुन्हा लोकशाही पद्धतीचं सरकार यावं असं त्याचं म्हणणं आहे…म्यानमारची राजधानी नेपीडाव इथं सैन्यानं प्रतिबंध लावले आहेत…मात्र तरीही त्याठिकाणी लोक निदर्शनं करताहेत…पोलिसांकडूनही आंदोलकांवर रबरी गोळ्या चालवल्या जाताहेत…नेपीडाव इथं पोलीस आणि आंदोलकांमध्ये सतत चकमकी होताहेत…यात काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे..
लष्करानं उठाव करत लष्कर प्रमुख ‘मिन ऑन्ग ह्याईंग’ यांच्याकडे सत्ता सुपूर्त केली…आणि एका वर्षासाठी देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली…गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेली निवडणूक बनावट आणि खोटी होता…असं लष्कराचं म्हणणं आहे मात्र याबाबतीत कुठलाही पुरावा लष्करानं दिलेला नाहीये…
जवळपास एका दशकांनंतर म्यानमारमध्ये अस्थिरता पाहायला मिळतीये…कारण २००७ साली म्यानमारध्ये सैफ्रन रिव्हाल्यूशन (भगवी क्रांती) झाली होती…त्यावेळी हजारोंच्या संख्येनं बौद्ध भिक्षूक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते…तेव्हापासून म्हणजे तब्बल एका दशकानंतर म्यानमारमध्ये आता सर्वात मोठं आंदोलन होत आहे…
म्यानमारचं नाव आलं की ऑंग स्या स्यू की यांचं नावं आल्याशिवाय राहत नाही…लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांनी अनेक काळापासून राज्य करणाऱ्या लष्करी राजवटीविरोधात बंड पुकारलं होतं…१९९१ मध्ये स्यू की यांना नोबेल शांतता पुरस्कारसुध्दा मिळालाय…स्यू की यांनी 2015 मध्ये नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसी पक्षाचं नेतृत्व केलं…यात त्यांच्या पक्षाचा विजयही झाला…आणि जवळपास २५ वर्षानंतंर 2015मध्ये अशा लोकशाही पद्धतीनं निवडणुका झाल्या…स्यू की ह्या अनेक वर्ष तुरुंगात होत्या…लष्करी राजवट हटवून लोकशाही प्रस्थापित करण्याचा त्यांचा लढा जागतिक पातळीवर गाजला…यात कमालीची गोष्ट बघा, २०१५ सालच्या निवडणुकीत स्यू की यांचा निविर्वाद विजय झाला…मात्र त्यांना राष्ट्राध्यक्ष होता आलं नाही…कारण, स्यू की यांच्या मुलांकडे परदेशी नागरिकत्व होतं..आणि म्यानमारच्या घटनेनुसार परदेशी नागरिकत्व असल्यास देशाच्या प्रमुखपदी बसता येत नाही…यामुळे त्यांचं राष्ट्राध्यक्षपद गेल..मात्र, या घटनेनंतर 75 वर्षांच्या स्यू की यांच्याकडे म्यानमारचा नेता म्हणून पाहिलं गेलं…यानंतर आता २०२० साली झालेल्या निवडणुकीत स्यू की यांच्या पक्षाला गेल्यावेळेसपेक्षा जास्त मतं मिळाली..मात्र, यावेळी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप लष्करानं केला….आणि एका वर्षांसाठी आणीबाणी जाहीर करून टाकली..आणि याचविरोधात सध्या तिथं आंदोलन होताहेत.
म्यानमारसाठी आणीबाणी किंवा लष्करी राजवट हे काही नवीन नाहीये…याआधी १९६२ पासून ते २०११ पर्यंत म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता राहिलेली आहे….२०११ साली म्यानमारमध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणुका झाल्या आणि जनतेचं सरकार निवडून आलं.
Comments
Loading…