in ,

ऋषिकेश देशमुख यांच्या जामिनावर सुनावणी; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांच्या अटक पूर्व जामिनावर आज विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रिंगच समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते.

मात्र, अद्याप ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आता 20 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर, अनिल देशमुख यांना देखील 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा आरोप सक्त अमंलबजावणी संचालनालयाच्या वतीनं विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फेसबुक, इन्स्टाग्रामवर महिलांसाठी खास टूल, परवानगीशिवाय फोटो शेअर केल्यास कारवाई

omicron variant | परदेशातून आलेले आणखी तीन प्रवासी बाधित