in ,

Amazon Primeने भारतात सुरू केले प्राईम व्हिडिओ चॅनल, जाणून घ्या अॅप्सची किंमत

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्राइम व्हिडिओ चॅनेल सुरू केले आहेत. या नवीन सेवेअंतर्गत, प्राइम व्हिडिओ वापरकर्ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील 8 अॅप्समधून अनन्य सामग्रीमध्ये प्रवेश करू शकतील. आतापर्यंत Amazon प्लॅटफॉर्म तुम्हाला विविध प्रकारचे चित्रपट आणि दूरदर्शन शो, वेब सीरीजचे ऑनलाइन स्ट्रीमिंग प्रदान करत आहे.

पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रथमच प्राईम व्हिडीओ चॅनेल सादर करण्यात आले होते, ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही सेवा भारतासह 12 देशांमध्ये उपलब्ध आहे आणि 350 हून अधिक भागीदार प्लॅटफॉर्म आहेत. प्राईम व्हिडिओ वापरकर्त्यांना या 8 अॅप्समध्ये डिस्कवरी+, लायन्सगेट प्ले, डॉक्यूबे, इरोस नाऊ, एमयूबीआय, होईचोई, मनोरमा मॅक्स आणि शॉर्ट्स टीव्ही वापरता येतील. अॅप्स अॅड ऑन सबस्क्रिप्शन अंतर्गत हे अॅप्स वापरले जाऊ शकतात. ज्याची प्रेक्षकांना निवड करता येईल.

अमेझॉन प्राईम व्हिडिओ भारताच्या 99 टक्के पिन कोडमध्ये पाहिला जातो. ते पुढे म्हणाले की, अॅप म्हणून प्राईम व्हिडीओ स्मार्ट टीव्ही, अँड्रॉईड टीव्ही, स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये आधीच उपलब्ध आहे. वापरकर्ते एकाच ठिकाणी सर्व अॅप्सचे कंटेंट एक्सेस करू शकतील. यासाठी प्राईम व्हिडिओ अॅप्स किंवा वेबसाईट बंद करण्याची गरज भासणार नाही. तसेच, प्राईम सदस्य प्रास्ताविक वार्षिक सबस्क्रिप्शन ऑफरचा लाभ घेऊ शकतील, जे ओटीटी भागीदारांकडून उपलब्ध असेल.

Discovery+ -299 रुपये, – DocuBay-499 रुपये, Eros Now- 299 रुपये, Hoichoi- 599 रुपये, Lionsgate play- 699 रुपये, manoramaMAX- 699 रुपये, MUBI- 1999 रुपये, Shorts TV- 299 रुपये हि प्राईम व्हिडिओ चॅनेलमधील ओटीटी अॅप्सची किंमत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारासाठी घरीच नजरकैदेत ठेवा, सचिन वाझेची न्यायालयाकडे मागणी

अंबरनाथच्या डम्पिंगवर पडला लॉलीपॉपचा खच, अज्ञाताने टाकले लॉलीपॉप