in

नाशिकचे सुपूत्र अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण; जिल्ह्यात पसरली शोककळा

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण गावचे सुपूत्र अमोल हिम्मतराव पाटील (वय30) यांना वीरमरण आले.

बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे 14 जानेवारी रोजी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी सैनिकांच्या प्रशिक्षणावेळी 11 के.व्ही. उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने 3 जवानांचा मृत्यू झाला. ह्याशिवाय 10 सैनिक जखमी झाले आहेत. जखमींना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान अमोल हिम्मतराव पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच बोलठाणसह संपूर्ण नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ह्या दिवशी साजरा केला जाणार ‘ स्टार्ट-अप दिवस’; जाणून घ्या तारीख

महत्वाची बातमी ! प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख जाहीर