in

अमरावती बोट दुर्घटना; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी

सूरज दहाट | अमरावती बोट दुर्घटनेत 11 जण बुडाल्याची घटना घडली होती. या घटनेत 3 मृतदेह हाती आले असून असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री साहाय्याता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करून ही मागणी करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले असता या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत. NDRF,SDRF व जिल्हा शोध पथकाला अपयश आले असून ३२ तासांच्या शोध मोहीमे नंतरही एकही मृतदेह सापडला नाही. उद्या पुन्हा सकाळी शोध मोहिमेला सुरवात होणार आहे. अजून आठजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निवेदन देत आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Jalyukat Shivar Yojana | भाजपच्या अडचणी वाढणार? जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू

वेंकीज कंपनीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला हिरवा कंदील; माणगाव खोराला फायदा