in

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा बिगुल वाजला

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 21 संचालक पदाच्या निवडीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरु होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.

सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. या बँकेची निवडणूक तब्बल 11 वर्षांनी होऊ घातली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील निगडीत व राजकीय नेते मोर्चेबांधणीला अगोदरच पासूनच लागले होते. तर काल उशिरा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवाने निवडणूक जाहीर केली आहे, आज पासून नामांकन अर्ज दाखल करण्यात सुरुवात होणार आहे.

4 ऑक्टोबरला निवडणूक तर 5 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात आता जोरदार लॉबींग सुरू झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परभणीत जोरदार पावसाला सुरुवात

सिल्लोड शहरासह तालुक्यात जोरदार पावसाचे आगमन