लोकशाही न्यूज नेटवर्क
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या क्षेत्रात असलेल्या सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर चेतन गावंडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
राज्यत कोरोनाचे रुग्ण घटत असल्याने महापालिका क्षेत्रातील शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, अचानक गेल्या आठवड्यात महापालिकेच्या क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे 5 वी ते 8 वीच्या खाजगी शाळा व महापालिकेच्या शाळा बंद करण्यात आला आहेत, अशी माहिती अमरावती महापालिकेने शाळांना पाठविली आहे.
Comments
Loading…