in ,

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पहिल्या फेरीत बच्चू कडू विजयी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचे मतदान काल पार पडले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी १४ तालुक्यांतून १६८७ जण मतदानाचा हक्क बजावला आहे. बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत असले तरी चार जागांवर चार संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.

सुमारे ११ वर्षानंतर अमरावती जिल्हा बँकेची निवडणुक झाली. गेल्या ११ वर्षांपासून बँकेवर काँग्रेसप्रणीत सत्ता होती. सहा महिन्यांपूर्वी बँकेतील ७०० कोटी गुंतवणुकीचे प्रकरण समोर आले आणि कधी नव्हे ती बँक प्रचंड चर्चेत आली. संपुर्ण निवडणुकीत हाच मुद्दा केन्द्रस्थानी राहिला आहे.

मतमोजणीचा पहिला निकाल हाती आला असून परिवर्तन पॅनलचे उमेदवार व राज्यमंत्री बच्चू कडू यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचा पराभव करत बच्चू कडू यांचा विजय झाला. बच्चू कडू यांना २२ तर बबलु देशमुख यांना १९ मते मिळाली. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने खाते उघडले आहे.

या निवडणुकीत प्रथमच राज्यमंत्री बच्चू कडू सह तीन विद्यमान आमदार निवडून रिंगणात असल्याने हि निवडणुक प्रतिष्ठेची झाली असून अमरावती जिल्हा सह राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. तसेच या निवडणुकीत काँग्रेस नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच वेगळे वेगळे पॅनल असल्याने बच्चू कडू व यशोमती ठाकूर या दोन महाविकास आघाडी मधील मंत्र्याचे भवितव्य पणाला लागले होते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बदलापुरात आला बिबट्या!

‘भाजपमधील ‘त्या’ नगरसेवकांचा डीएनए राष्ट्रवादीचाच’