in

अमरावतीच्या युवकाचा अटकेपार झेंडा; स्कॉटलँड संसदेत घेतली खासदारकीची शपथ

मूळचे अमरावती शहरातील रहिवासी व सध्या स्कॉटलॅड इथं वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांच्या यशाने राज्यासह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील रहिवासी श्री प्रकाश व सौ. पुष्पा गुल्हाणे यांचा एकुलता एक मुलागा संदेश गुल्हाणे यांचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेले संदेश गुल्हाणे यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. २०२१ मध्ये डॉ. संदेश यांनी स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. स्कॉटलंडमध्ये निवडून गेलेल्या भारतीय वंशाचे ते पहिले पुरुष आहेत.

डॉ. संदेश गुल्हाने यांनी कोविड फ्रंटलाइनवर काम केल्यानंतर होलीरूड निवडणुकीत टॉरीजसाठी उभे राहण्याचे ठरविले. पीपीई कीट पुरवठा विषय, मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत आणि कोविड यांनी जीपीला स्कॉटिश संसदेमध्ये आपले ‘वास्तविक जागतिक आरोग्य कौशल्य” आणायला लावले. ग्लासगो आणि आसपासच्या भागात शस्त्रक्रियांमध्ये काम करणारे गुल्हाणे हे ग्लासगो क्षेत्राच्या टोरी यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहेत. ते एसएनपीचे न्याय सचिव हमजा यूसुफच्या विरोधातही पोलॉकमध्ये उभे होते.

जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी डॉ. संदेश गुल्हाणे यांचे मामेभाऊ महेश सुरंजे सांगतात. माझे मामा श्री प्रकाशसा गुल्हाणे लंडन येथील एका खासगी कंपनी अभियंता म्हणून कार्यरत होते. ८ तारखेला डॉ. संदेश गुल्हाणे स्कॉटिश पार्लमेंटमध्ये निवडणूक आल्याची माहिती मिळताच आमचा आनंद द्विगुणीत झाला. एक सर्वसामान्य कुटुंबातील युवकानं कुठल्याही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरणासाठी आधार सक्तीबाबत यूआयडीएआयकडून दिलासा!

Tauktae Cyclone Update | तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, ऑरेंज अलर्ट जारी