in

पाहा अमृता खानविलकरचं क्लासी फोटोशूट

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरनं हे फोटोशूट केलं असून अमृता या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

‘वाजले की बारा’ म्हणत रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ‘राझी’अभिनयाने अमृताने बॉलिवूडमध्येही आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरनं आता आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेले अनेक दिवस योगा करतानाचे फोटो शेअर करत असतानाच आता तिनं पारंपारिक अंदाजात काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरनं हे फोटोशूट केलं असून अमृता या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

अमृताने ‘खतरोंके खिलाडी’मध्येसुद्धा तिने जोरदार प्रदर्शन केलंय. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पर्यटकांना पोलिसांकडून लगाम

संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना पत्र… मराठा आंदोलनाचे नवे समीकरण?