कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी येते. मुबंई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असले तरीही या मार्गावरील अत्यंत महत्वाचा टप्पा असलेल्या कशेडी घाटातील भोगदा तयार होण्यासाठी डिसेंबर 22 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
कशेडी घाटातला प्रवास हा प्रत्येक कोकणवासियासाठी डोकेदुखी असते. खराब रस्त्यांमुळे हा प्रवास जिवघेणा ठरतो. या प्रवासात वेळ देखील जास्त लागतो. पण आता कोकणवासियांना हे चित्र बदललेलं दिसणार आहे. पुढच्या वर्षापर्यंत सुखकर होणार आहे. कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्याचं काम सध्या सुरू आहे.
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सिमेवरती असलेला कशेडी घाट म्हणजे मृत्यूची वाट, अशी ओळख बनलेली आहे. गेली दोन वर्षांपासून या कामाला सुरूवात झाली असून या मार्गावरील एकमेव बोगद्याचे काम अद्ययावत यंत्रसामुग्रीने करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून पहिल्यांदाच प्रत्येक तीनशे मीटर इतक्या अंतरावर चक्क भोगद्यात क्रॉसिंग कॉर्नर ठेवण्यात आले आहेत ज्यामुळे सहजगत्या एका भोगद्यातून दुसर्या भोगद्यात जाणे शक्य होणार आहे पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आलेल्या या बोगद्यांचे कामे सध्या कशी सुरू आहेत त्याचा आढावा घेऊन समन्वयक यांच्या सोबत बातचीत केली आहे.
जवळपास २०० कामगार यासाठी दिवसरात्र काम करताय. कशेडीचा अवघड आणि धोकादायक घाट रस्ता पार करायला 40 ते 45 मिनिटं लागतात. मात्र बोगद्यामुळे हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात होणार आहे. ४०० कोटी रुपये यासाठी खर्च केले जातायत.
Comments
Loading…