वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची तयारी दाखवली आहे. आता मुद्द्यावरून आता उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आंनद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं”, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. विरोधकांकडून पुन्हा लॉकडाउन लागू करण्याला विरोध केला गेला असतानाचा आता उद्योगपती लॉकडाउनचा विरोध करत आहेत.
आपल्या ट्वीटमधून आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देखील दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नुकतीच आरोग्य विभागातील आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन संदर्भात सूचना केल्या आहेत. “जर नागरिकांकडून सातत्याने कोविड संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल, तर लॉकडाऊनसारख्याच निर्बंधांची तयारी सुरू करा”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Comments
Loading…