in

जिगरबाज मयूर शेळकेला रेल्वेकडून ५० हजार, तर जावाकडून बाईक

नवी मुंबईच्या वांगणी रेल्वे स्टेशनवरील पॉइंटमनने प्रसंगावधान दाखवल्याने एका चिमुकल्याचे प्राण वाचले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. पॉइंटमनने दाखवलेल्या तत्परतेमुळे अंधमातेच्या मुलाचा जीव वाचला.
यानं मयूर शेळकेच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. यानंतर त्याच्यावर सर्व स्तरांतून बक्षिसांचा वर्षाव देखील होत आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलंय.

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईंटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे.

विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून शेळकेंना ५० हजारांचे बक्षीस जाहीर झाले आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील मयुरचे कौतुक केले असून जावा मोटरसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी जावा मोटरसायकल गिफ्ट देणार असल्याचं सांगितलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS vs SRH | हैदराबादचा पंजाबवर शानदार विजय

Gaja Marane Case | ”आता सापडणार नाही”, जामीन मिळाल्यानंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया…