शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार अनंत तरे (६७) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते . अनंत तरेंवर ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच संध्याकाळी ४.४५च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अनंत तरे यांच्यावर उद्या दुपारी दोन वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. (shivsena leader anant tare passes away)
अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर २००० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. २०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. तीन वेळा ठाणे शहराचे महापौर पद भूषवण्याचा मान अनंत तरे यांना मिळाला होता. त्याच प्रमाणे ते कोळी समाजाचे नेते होते. शिवाय एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचं सामाजिक चळवळीती योगदान मोठं होतं. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठे नुकसान झाले आहे.
Comments
Loading…