in

अशी संपली बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांच्यातील मैत्री

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार आणि शिवसेना अध्यक्ष बाळ ठाकरे यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, एका कारणामुळे त्यांची मैत्री तुटली होती.

बाळासाहेब ठाकरेंनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. “आम्ही एकत्र जुन्या ‘मातोश्री’च्या गच्चीत बसायचो. त्यावेळी बियर पित होतो आणि मी गच्चीत बसायचो. दिलीप कुमारचा फोन यायचा बाळु साहेब काय करत आहात? मी म्हटलं की बियर पितोय. तर दिलीप कुमार म्हणाला येऊ का? मी म्हटलं ये आणि आम्ही दोघं गच्चीत बसायचो. त्याला ते चने भयंकर आवडले. त्यानंतर तो फोन करून विचारयचा की चने खायला येऊ का? मी म्हणायचो ये अशी आमची मैत्री होती,” असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

पण जेव्हा दिलीपने पाकिस्तान सरकारचा ‘किताब ए पाकिस्तान’ स्वीकारला त्यानंतर बाळासाहेबांनी दिलीप कुमारांसोबत मैत्री तोडली. त्यांच्या सोबत सुनील दत्त ही गेले होते म्हणून त्यांच्या सोबतही मैत्री तोडली कारण . त्यावेळी बाळासाहेबांनी तुला हिंदुस्तानने मोठं केलं पाकिस्तानने नाही. असे दिलीप कुमार यांनी सांगितले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dilip kumar | दिलीप कुमार यांचे गाजलेले चित्रपट

Modi cabinet expansion : राज्यमंत्र्यांना मागितला राजीनामा