in

…म्हणून अनिल देशमुख ED समोर हजर झाले, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले खळबळजनक कारण

अनिल ठाकरे, चंद्रपूर | मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे. आणि आजच्या दिवशीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या चौकशीस सामोरे गेले आहेत. दरम्यान या सर्व घडामोडींवर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळजनक आरोप करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या SIT च्या ताब्यात आल्यावरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ED समोर येण्याचा मुहूर्त का साधला ? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सवाल उपस्थित केला. आपण सांगू ते SIT सचिन वाझे कडून वदवून घेतील आणि त्यामुळे मी आता ED समोर गेलो तर धोका नाही असं देशमुख यांना वाटलं असावं असा मुनगंटीवार यांचा आरोप आहे.

आपल्याला अटक पूर्व जामीन मिळणार नाही, संपत्तीवर टाच येईल आणि सचिन वाझे ची SIT कस्टडी यामुळे देशमुख ED समोर आले असावे असा मुनगंटीवार यांनी आरोप केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भिवंडी पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे एकनाथ पाटील बिनविरोध

Pratik Kale Suicide Case ; जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या चौकशीची भाजपची मागणी